Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?

Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?

Power of Attorney : विराट कोहलीने त्याच्या भावाच्या गुरुग्राम मालमत्तेसाठी पॉवर ऑफ अटॉर्नीजारी केली आहे. हा करार केल्यानंतर नेमकं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:00 IST2025-10-16T13:09:46+5:302025-10-16T14:00:36+5:30

Power of Attorney : विराट कोहलीने त्याच्या भावाच्या गुरुग्राम मालमत्तेसाठी पॉवर ऑफ अटॉर्नीजारी केली आहे. हा करार केल्यानंतर नेमकं काय होतं?

Virat Kohli Grants General Power of Attorney to Brother Vikas Kohli for ₹80 Crore Gurugram Property | Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?

Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?

Virat Kohli Gurugram Property: भारतीय संघाची सुप्रसिद्ध जोडी रोहित-विराट लवकरच मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याआधीच एका बातमीने विराट चर्चेत आला आहे. कोहलीने नुकतीच आपल्या गुरुग्राममधील मालमत्तेची 'जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी' आपला मोठा भाऊ विकास कोहली यांच्या नावावर केली आहे. विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलांसोबत लंडनमध्ये राहत असल्यामुळे, मालमत्ता आणि कायदेशीर कामांसाठी वारंवार भारतात येण्याचा त्रास वाचवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे, पॉवर ऑफ अटॉर्नी हा दस्तऐवज सध्या चर्चेत आला आहे.

पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय?

पॉवर ऑफ अटॉर्नी हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे मालमत्तेचा मालक (ज्याला प्रिन्सिपल म्हणतात) त्याच्या मालमत्तेची विक्री करणे, देखभाल करणे किंवा त्यासंबंधी इतर निर्णय घेण्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला (ज्याला एजंट म्हणतात) सोपवतो.
उदाहरण: विराट कोहली (प्रिन्सिपल) याने आपला भाऊ विकास कोहली (एजंट) याच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी बनवली आहे. आता गुरुग्राममधील मालमत्तेच्या संदर्भात विकास कोहली जे काही निर्णय घेतील, ते कायदेशीररित्या ग्राह्य धरले जातील.
पॉवर ऑफ अटॉर्नी मिळाल्यानंतर, एजंट प्रिन्सिपलप्रमाणेच (मालकाप्रमाणे) मालमत्तेवर सर्व कामे करू शकतो.

पॉवर ऑफ अटॉर्नीचे प्रकार

जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी 
या प्रकारात एजंटला प्रिन्सिपलची सर्व कामे (उदा. विक्री, भाड्याने देणे, देखरेख ठेवणे, बँकेचे व्यवहार) करण्यासाठी व्यापक अधिकार मिळतात.
विराट कोहलीने आपल्या भावाला याच प्रकारची पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आहे.

स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी
या प्रकारात एजंटला एखादे विशिष्ट काम करण्यासाठीच अधिकार दिला जातो.
उदाहरणार्थ: 'फक्त ही एक विशिष्ट मालमत्ता विकणे' किंवा 'एका विशिष्ट कोर्ट केसमध्ये उपस्थित राहणे' अशा मर्यादित कामांसाठी याचा वापर होतो.

पॉवर ऑफ अटॉर्नी कशी बनवली जाते?

  • स्टॅम्प पेपर: हा दस्तऐवज ₹१०० च्या नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर तयार केला जातो.

  • नोटरी : दस्तऐवज नोटराईज्ड करणे आवश्यक असते, ज्यामुळे त्याला कायदेशीर वैधता मिळते.

  • स्वाक्षरी आणि साक्षीदार : पॉवर ऑफ अटॉर्नी बनवणारा व्यक्ती (प्रिन्सिपल) आणि PoA स्वीकारणारा व्यक्ती (एजंट) यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. याशिवाय, किमान दोन साक्षीदार असणेही गरजेचे आहे.

वाचा - कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?

जे लोक सतत देशाबाहेर राहतात किंवा आजारपणामुळे स्वतः निर्णय घेण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी हा मालमत्ता व्यवस्थापनासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सोयीस्कर कायदेशीर मार्ग आहे.

Web Title: Virat Kohli Grants General Power of Attorney to Brother Vikas Kohli for ₹80 Crore Gurugram Property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.